प्रतिनिधी- सगीर शेख खर्डी
ठाणे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमधील नोकर भरतीची जाहिरात गुजरात येथील वर्तमान पत्रामध्ये देण्यात आल्याने मनसेने थेट प्रधिकरणाच्या कार्यालयात धडक देत ही जाहिरात मागे घेण्यास भाग पाडले उरण येथिल पोर्ट ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरभरती होणार असून त्याची जाहिरात गुजरात मधील एक वर्तमानपत्रात देण्यात आली
यामुळे मराठी तरुणांना नोकऱ्यातून डावण्याचा धोका निर्माण झाल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला होता याची दखल घेत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आज शिष्टमंडळसाह जेएनपीटी पोर्ट ट्रस्ट येथिल अध्यक्ष उमेष वाघ यांच्या कार्यालयावर धडक दिली यावेळी त्यांनी जेएनपीटीची गुजरात येथे दिलेली जाहिरात रद्द करण्याची मागणी केली
मागणी ती तत्काळ मान्य करण्यात आली तसेच यापुढे जेएनपीटी मध्ये होणाऱ्या नोकर भरतीमध्ये मराठी मुलांना सामावून घेण्यात येईल तसेच जाहिरात देखील महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात दिली जाईल असे लेखी आश्वासन श्री वाघ यांनी दिले आहे


