अकोला जिल्हा प्रतिनिधी: – गणेश वाडेकर
अकोला – 6 (U -17) १७ वर्षाआतील राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा मुले व मुली दि. 19 ते 25 जून दरम्यान रोहतक हरियाणा येथे पार पडल्या. सदर स्पर्धेमध्ये मुंबई विभागाची व मूळची अकोला येथील अँड केशव हरिगिर गिरी यांची नात कोमल सव्यसाची गिरी हिने चमकदार कामगिरी करत कांस्य पदकाला गवसणी घातली.
सदर स्पर्धेमध्ये तिचे कोच श्री कृष्णादास सर मुंबई यांनी महत्वाची भूमिका बजावली असून तिचा या कामगिरी बदल तिचे कौतुक होत आहे श्री सतीशचंद्र भट सर अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले आहे.स्पर्धेमध्ये महाराष्ट्र टीम सोबत कोच म्हणून श्री सचिन गर्दे पुणे , आदित्य माने ,गजानन कबीर क्रीडा प्रबोधिनी प्रशिक्षक अकोला संदीप जाधव, अजय मनोन मुंबई हे होते.

अकोला येथील माजी स्थायी समिती सभापती विलासभाऊ शेळके, माजी नगरसेवक राजूभाऊ काळे, अजय चव्हाण, नितीन ताकवाले, संजय अकोटकर, नंदू चोपडे, मनोज अंबेरे, पंकज सोनटक्के, कमलेश भरणे, हरीश उंबरकर यांचेसह सर्व स्तरातून तिचे अभिनंदन केले जात आहे.
तिने आपल्या यशाचे श्रेय गुरुजन आणि वडील सव्यसाची गिरी व आई मीनल गिरी यांना दिले आहे.


