बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी – सुनील वर्मा
सध्या पावसाळ्याचे दिवस आहे शाळकरी विद्यार्थी शाळेत आपल्या बस स्थानकापासून ये जा करत असतात तसेच शेतकरी वर्ग सुद्धा शेतीला लागणारी बी बियाणे औषधी आपल्या खेड्या गावातून मुख्य रस्त्यावर पैदल जावे लागते तेथे कुठल्याही प्रकारचा प्रवासी निवारा नसतो शाळकरी मुले सुद्धा त्या फाट्यावर येऊन झाडाच्या खाली उभे असतात पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि सिंदखेड राजा मतदार संघात विजेचे कडकडासह काहींना आपले प्राण गमवावे लागले आहे
अशातच काही मुले नागरिक आपल्या गावा लगतच्या फाट्यावर येऊन थांबतात परंतु तेथे प्रवासी निवारा नाही पाऊस असो वारा असो पाणी असो अशातच त्यांना झाडाच्या आश्रयाने उभे राहावे लागत आहे आमदार साहेब आपण या मतदारसंघाचे आमदार आहात अगोदरच्या आमदाराने वीस पंचवीस वर्षे सत्ता भोगली परंतु मतदार संघामध्ये प्रवासी निवारा बहुतेक ठिकाणी झाला नाही आमदार साहेब आपण नवतरुण आणि शिक्षणाची जाण असलेले शिक्षण क्षेत्रातही आपण आपले पाय रोवलेले आहे आपण आपण या शिक्षण घेणाऱ्या मुलां आणि मुली करिता ज्येष्ठ नागरिकांकरिता प्रवासी निवारा कधी बांधाल शाळकरी विद्यार्थी आपल्या प्रवासी निवाऱ्याची वाट बघतायेत ज्येष्ठ नागरिक सुद्धा मोठ्या अशाने थांब्यावर बसण्याची वाट बघतायेत
आमदार साहेब आपण या प्रवासी निवारासाठी आपल्या निधीतून तात्काळ खर्च कराल अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे लोणार तालुकाध्यक्ष दिलीप राठोड यांनी एका प्रसिद्धी द्वारे केली आहे

