प्रतिनिधी: – नागनाथ लांजे
१ कोटी ४६ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त…..
अहमदपूर तालुक्यातील लातुर नांदेडच्या सिमेवरील भागात असलेल्या राळगा शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात गंगाखेड येथील गोदावरी नदीच्या पात्रातुन वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू साठा साठवुन तो चोरट्या पध्दतीने टिप्परद्वारे विक्री करत असल्याची गुप्त माहिती दि २४ जुन रोजी मंगळवारी पहाटे आय.पि.एस पोलीस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी यांना मिळाली असता तात्काळ त्यांनी पथकासह सदरील ठिकाणी दि २४ जुन रोजी पहाटे ०४:३० ते ०५ : ०० वाजण्याच्या सुमारास छापा टाकून चार हायवा टिप्पर , दोन जेसीबी, एक बोलेरो २० ब्रास वाळूसह १ कोटी ४६ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अहमदपूर पोलीसात १२ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी पोलीस सुत्राकडून मिळालेली माहीती अशी की,अहमदपूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैद्य मार्गाने गंगाखेड येथील गोदावरी नदीपात्रातुन उपसा केलेली वाळू लातुर- नांदेडच्या सिमावर्ती भागातील राळगा शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात मोठ्या प्रमाणात साठा करून तो रात्रीच्या वेळी टिप्परच्या साह्याने चोरट्या पद्धतीने अहमदपूर शहरासह इतर ठिकाणी विक्री केला जात असल्याची गुप्त माहीती खबऱ्या मार्फत दि २४ जुन रोजी पहाटेच्या सुमारास अहमदपूरचे प्रभारी उप- विभागीय पोलीस अधिकारी , चाकुर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा आय.पि.एस पोलीस अधिकारी उप-अधिक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांना मिळाली .
त्यानंतर त्यांनी पोलीस अधिक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधिक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि २४ जुन रोजी पहाटे ०४:३० ते ०५ : ०० वाजण्याच्या दरम्यान पो कॉन्स्टेबल/४६१ आकनगीरे, पो. कॉन्स्टेबल/४२३ लक्ष्मण आरदवाड, पो कॉन्स्टेबल/४१० धडे,पो कॉन्स्टेबल/११०५ दिपक सोनकांबळे,पो.कॉन्स्टेबल चापोली/१८६९ रायभोळे.तसेच पोलीस स्टेशन अहमदपूर येथील पोलीस निरिक्षक बि. डी भूसनुर व रात्र पाळीचे आमलदार सहाय्यक पो. नि.दिंडगे, पो. कॉन्स्टेबल/१७६७ मारुती शिंदे , पो कॉन्स्टेबल राजगीरवाड आदी पथकासह राळगा शिवारातील सखाराम नामदेव राठोड गट क्र १५१ या शेतकऱ्याच्या शेतात अचानक छापा टाकून जेसीबी क्र एम.एच २४ बि.एल ८०९० एमएच ४० सिएच ८१६१ प्रत्येकी दोन जेसीबी किंमत एकूण ६० लाख, बोलेरो क्र एम एच २२ पि २२३३ किंमत ५ लाख हायवा टिप्पर क्र एम एच ०४ जि सी ४८१४ , एम एच ४४ यु ९५९६, एम एच २४ एबि ६३९९ , एम एच ०४ एच वाय ७०८६ चार हायवा किंमत एकूण ८० लाख रूपये, २० ब्रास वाळु १ लाख रू एकूण ८ मोबाईल किंमत ७६ हजार ५०० रोख रक्कम २१ हजार ५०० असा एकून १ कोटी ४६ लाख ९८ हजार रूपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पोकॉ आकणगीरे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय चाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १. प्रशांत महेद्र आगलावे वय ३३ वर्ष रा. चिलका ता अहमदपूर
२. ओमकार सुग्रीव जाभाडे वय २१ वर्ष रा. शिंदगी बुद्रूक ता. अहमदपूर ३. सगमेश्वर निवृती नरवटे वय ३९ वर्ष रा. करंजी ता. जळकोट ४. संतोष सतिष शेळके वय ३२ वर्ष रा. कोकनगा ता. अहमदपूर ५. सखाराम नामदेव राठोड वय ३८ वर्ष रा. राळगा तांडा ता अहमदपूर ६. शेख फत्तूसाब इस्माईल वय ५५ वर्ष रा. घर ता. उदगीर ७. प्रशांत उत्तम नाटे वय २२ वर्ष रा. गोताळा ता. अहमदपूर
८. भैयासाहेब बळीराम कांबळे वय ४० वर्ष रा कबनसागवी ता. चाकूर९. संतोष कुलाल रा. उदगीर १०. सोमनाथ माळी रा. घर ता. उदगीर ११. दस्तगीर पठाण रा. उदगीर १२. संगम राजकूमार कदम रा. अहमदपूर
आदी जणांवर गुरनं ४४६/२५ कलम ३०३ ( २ ), ३ ( ५ ) बि.एन.एस सह कलम पर्यावरण अधिनियम कलम १५ प्रमाणे दि २४ जून रोजी अहमदपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे पुढील तपास सहा – पोलीस उपनिरीक्षक संतोष केदासे हे करीत आहेत.


