सरकार यांच्या पुढाकाराला मोठा प्रतिसाद
कोल्हापूर विभाग् प्रतिनीधी: -किशोर जासूद
कोल्हापूर:
“अवयवदान म्हणजे अमूल्य जीवनदान” या प्रेरणादायी विचारांवर आधारित योगदान पोर्टल आणि पर्व शैक्षणिक विश्वस्त संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या अवयवदान मोहिमेला कोल्हापूर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या मोहिमेचे नेतृत्व पर्व शैक्षणिक संस्थेचे प्रमुख प्रवीण वराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख सागर शेळके यांनी या उपक्रमासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. देवठाणे (जि. कोल्हापूर) येथील सुरज कुंभोजे सरकार यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवत अवयवदानासाठी अर्ज भरला आहे. “अवयवदान हे केवळ दान नव्हे, तर नवजीवनाचा संकल्प आहे,” असे ते म्हणाले. त्यांच्या या कृतीमुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे.
जनजागृतीचे व्यापक प्रयत्न:
अवयवदान मोहिमेअंतर्गत योगदान पोर्टल आणि पर्व संस्थेने व्यापक जनजागृती सुरू केली आहे. “एक अवयवदान अनेक आयुष्यांना नवसंजीवनी देऊ शकतो,” असा संदेश देत संस्थेने नागरिकांना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील मोठा प्रतिसाद:
कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. पत्रकार किशोर जासुद यांच्या सकारात्मक संदेशांमुळे अवयवदान मोहिमेची लोकप्रियता वाढत आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात जागरूकतेचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
आव्हान व पुढील वाटचाल:
या मोहिमेच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांनी अवयवदानात सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या उपक्रमामुळे मानवतेसाठी नवा दीपप्रकाश झाला आहे.
संपर्क:
अवयवदान मोहिमेबाबत अधिक माहितीसाठी योगदान पोर्टल व पर्व संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


