राळेगाव तालुका प्रतिनिधी :- कविता धुर्वे
महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून अनेक जिल्ह्यात गाजत असलेले बोगस शिक्षक भरती प्रकरणी अजूनही शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात कार्यवाही झाली नसून ही बोगस शिक्षक भरती प्रकरणी एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी.
तसेच विदर्भातील शिक्षण विभागातील प्राथमिक , माध्यमिक अधिकारी कर्मचारी यांची रिक्त पदे पदोन्नतीने तात्काळ भरण्यात यावी अशा अनेक मागण्या घेऊन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने दिनांक 27/6/2025 रोज शुक्रवारला शिक्षक उपसंचालक अमरावती आणि नागपूर येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले सर माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाणे सर आणि प्रांतिक अध्यक्ष अरविंद देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली वेळ दुपारी ठिक 4.00ते 5.00 वाजेपर्यंत धरणे/ निदर्शने करण्यात येणार असून या धरणे आंदोलनाला अमरावती आणि नागपूर येथे प्रांतिक पदाधिकारी व माजी प्रांतिक पदाधिकारी मुरलीधर धनरे ,जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी अध्यक्ष पवन बन , कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे,माजी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तथा सल्लागार अशफाक खान, कार्याध्यक्ष आनंद मेश्राम, विजय खरोडे, सल्लागार मनोज जिरापुरे, उपाध्यक्ष साहेबराव धात्रक,श्रावणसिंग वडते, श्याम बोडे, मंगला वडतकर, संजय पुरी,श्रिकांत अंदुरकर, गणेश धर्माळे, जिल्हा सहकार्यवाह उमाकांत राठोड, विठ्ठल परांडे, गुलाब सोनोने,संध्या जिरापुरे, दिवाकर नरूले, महेश अंदुरे,उन्मेद डोंगरे, कोषाध्यक्ष गंगाधर गेडाम, जिल्हा संघटक भुपेंद्र देरकर, संतोष हेडाऊ, अरूण गारघाटे, गजेंद्र काकडे, पंकज राठोड, महिला प्रतिनिधी वैशाली चौधरी मॅडम, सदस्य विलास वाघमारे व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतिक अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी केले
असून सर्व पदाधिकारी बंधू भगिनींनी उपस्थित राहण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पवन बन व जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे सर आवाहन केले असल्याची माहिती यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

