बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी :-सुनिल वर्मा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर स्थानिक भाजप समर्थकांनी विधानसभा संघटक गजानन मापारी, जिल्हा सचिव मारोतराव सुरुसे, विजय मापारी यांच्या नेतृत्वाखाली जल्लोषात जल्लोष केला आणि फटाकेफोडून आनंद व्यक्त केला.

या प्रसंगीमुख्यमंत्रीपदी फडणवीस यांची निवड हे राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या हिताच्या दृष्टीने उचललेले पाऊल असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी कार्यकत्र्याने सांगितले , “फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्याची अपेक्षा आहे. त्यांचा अनुभव आणि प्रशासकीय कौशल्य राज्याला भक्कम नेतृत्व देईल. यावेळीपक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत हे सरकार युवकांच्या भवितव्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असे सांगून भाजप कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत एकजुटीने व झोकून देऊन पक्ष अधिक मजबूत करण्याचा संकल्प केला.
यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले , अजीम चौधरी, देवांग संचेती, अर्जुन रामावत, मुळेंगे, फोलाणे, शुभम देसाई, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


