अकोला विभाग प्रतिनिधी: - गणेश वाडेकर
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी अकोट शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपी प्रथमेश विनोद भटकर (२१), मोहित विनोद भटकर (१८, रा. गवळीपुरा) याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. बांधकामाच्या कारणावरून प्रमोद भटकर व त्यांच्या पत्नीवर लोखंडी पाइपने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यात आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात सरकारी वकील अजित देशमुख यांनी जामीन अर्जाला विरोध करताना युक्तिवाद सादर केला….


