प्रतिनिधी :-सगीर शेख (खर्डी)
ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यात हा आदिवासीबहुल तालुका असून स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही येतील आदिवासींना मूलभूत गरजा सुख सुविधांची वानवा आजही दिसून येत आहे दरम्यान 23 जून रोजी शहापूर तालुक्यातील कि किन्हवली परिसरातील नडगाव सो ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चाफे वाडी येथील संगीता रवींद्र मुकणे 21 या गर्भवती महिलेला प्रसूतीकरिता रुग्णालयात नेण्याकरिता सोमवारी डोळीने न्यावे लागले
आरोग्य यंत्रणेची रुग्णवाहिका रस्ता नसल्याने चाफेवाडीत पोहोचू शकत नाही त्यामुळे येथील आदिवासी बांधवांनी या महिलेला डोलीत घालून रुग्णव रुग्णवहिकेपर्यंत नेले या ग्रामपंचायत हद्दीतील चाफ्यची वाडी ते डोंगरी वाडी असा दोन किलोमीटरचा रस्ता आहे मात्र यातील एक किलोमीटरची जागा खासगी असल्याने रस्त्यासाठी जागा मिळत नाही 23 जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास संगीता हिस प्रसूती वेदना जाणवू लागल्या ,रस्ता नसल्याने या गर्भवती महिलेला डोलीच्या साह्याने रुग्णवाहिकेपर्यत नेले रुग्णवाहिकेपर्यत पोहोचण्यास उशीर झाल्याने या गर्भवती महिलेला आकडी आली यामुळे तिला प्रसूतीकरिता ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले
शासनाच्या उदासीन धोरणामुळे संगीता सारख्या अनेक गर्भवती महिलांना या अगोदरही अशा असह्य वेदना सहन कराव्या लागल्या आहेत.

