बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:- सुनील वर्मा
दिनांक 23 जून रोजी शाळेचा पहिलाच दिवस आणि या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत पारंपारिक पद्धतीने करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्याना पुष्पगुच्छ देऊन व पारंपारिक पद्धतीने बैलगाडी जुपुन विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करत गाव मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी आनंदी वातावरण निर्माण झाले होते. एकीकडे जिल्हा परिषद शाळा बंद पडत असतांना दुसरीकडे हिरडव शाळा व्यवस्थापन समितीचे सगळीकडे जोरदार कौतुक होत आहे. याचा पंचक्रोशीत सर्वत्र चर्चा सुरू आहे. गटशिक्षणाधिकारी यांनी सुद्धा शाळेचे व समितीचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,शिक्षकवृंद व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

