गडचिरोलीत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न!
दि. २३ जून २०२५ | गडचिरोली
भारतीय जनसंघाचे संस्थापक, राष्ट्रनिष्ठ विचारवंत आणि तेजस्वी तत्त्वज्ञ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या चामोर्शी रोड, गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रम अत्यंत श्रद्धापूर्वक वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी त्यांच्या राष्ट्रहितासाठी दिलेल्या त्याग, दूरदृष्टी आणि “एक देश – एक विधान” या ध्येयासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करत अभिवादन व्यक्त केले. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भारतमातेची सेवा करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे,समन्वयक प्रमोदजी पिपरे,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे,ज्येष्ठ नेते सुधाकरजी येंगदलवार,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकरजी पेटकर,जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके,माजी नगराध्यक्ष भूपेंद्र कुळमेथे,नंदुजी काबरा, रमेशजी नैताम, महादेव पिंपळशेंडे, प्रशांत अल्लमपटलार,राकेश राचमलवार, फुलचंद वाघाडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

