शैक्षणिक साहित्य, श्रवण यंत्र व फर्स्टएड बॉक्स चे वाटप
प्रतिनिधी :-अरविंद कोठारी ( ठाणे)
ठाणे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चंदनवाडी शाखेच्या वतीने १० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ शनिवार सायंकाळी शिवसेना चंदनवाडी शाखा येथे शिव आरोग्य सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ व शिवसेना शहरप्रमुख प्रदिप शिंदे यांच्या शुभहस्ते आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरु करण्यात आला. या सोहळ्यामध्ये १०० हून अधिक १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिवसेना उपविभागप्रमुख,शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा समन्वयक आणि हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ अहिरे यांचा वाढदिवसही शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला, तेव्हा त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील कामाबद्दल यू.एस.ए. बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे सर्टिफिकेट ऑफ अचीवमेंट अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले तसेच आरोग्य विषयक महत्वपूर्ण असे श्रवण यंत्र वाटप तसेच विविध सोसायटी मंडळांना फर्स्ट एड बॉक्स ही वितरित करण्यात आले.
त्याप्रसंगी माजी आरोग्य सभापती दत्ताराम (अप्पा) मोरे, शिवसेना शहर समन्वयक रामभाऊ काळे, शिवसेना उपशहरप्रमुख वसंत गव्हाळे, शिवसेना विभागप्रमुख श्री जिवाजी कदम, उपविभागप्रमुख दत्ता सावंत, शिवसेना शाखाप्रमुख तानाजी कदम, सुरेश सावंत, ज्ञानेश्वर बागवे, भास्कर शिर्के, संजय भोसले, धोंडू मोरे, जगदीश शिर्के तसेच शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ.प्रशांत विट्ठल भुईंबर, देवाशी राठोड, अजय राणे, अझीम शेख, अक्षता पांचाळ, चंद्रकांत विधाटे, अजित माने, लितेश केरकर व त्याचबरोबर हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव सचिन त्रिवेदी आणि प्रभागातील सर्व मित्र परिवार, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, शिव आरोग्य सेना पदाधिकारी, आरोग्य सैनिक, हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


