अकोला जिल्हा प्रतिनिधी:- गणेश वाडेकर
अकोला : येथील जिल्हा परिषदमध्ये समाज कल्याण विभागामध्ये कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी संतोष आडे साहेब यांचे सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक तथा कलावंतांना उत्तम मार्गदर्शन करून त्यांच्या अडी अडचणी दूर करीत असल्याने खेड्यापाड्यातील कलावंतांची आस्थेने विचारपूस करून त्यांचे सकारात्मक कार्याची दखल घेवून मदतीचा हात पुढे करत असल्याने न्यु महसुल कॉलनी खडकी बु. अकोला येथील मॉ जिजाऊ सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पंजाबराव वर यांचे प्रमुख उपस्थितीत ‘जिजाऊ गौरव पुरस्कार’, मानपत्र, मोमेंटो, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षतेखली ज्येष्ठ कलावंत डी.जे. वानखडे, कलावंत बी. गोपनारायण, साहित्यिक अर्जून घुगे बंधू, मिलिंद बनसोड, वर्हाडी झटकाचे संपादक दिलीप दांदळे, ़क्राईम ड्युटीचे संपादक दीपक शिरसाट, अकोला मेट्रोचे संपादक संतोष मोरे, वाचनालयाचे सभासद ओरा चक्रे सर, कलावंत अॅड. प्रजानंद उपर्वट, ़कवी/गायक अनिल श्यामस्कर, रंजनाताई संतोष आडे, जयश्री संतोष आडे, निर्भय रमेश राठोड आदींची उपस्थिती होती. सत्कार कार्यक्रमाचे संचालन अॅड. प्रजानंद उपर्वट यांनी केले तर आभार प्रदर्शन मॉ जिजाऊ वाचनालयाचे अध्यक्ष पंजाबराव वर यांनी मानले.

