अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
पातूर पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या कापशी रोड येथील शेतातील गोडाऊनमधून चोरट्यांनी ९० कट्टे ६० किलो वजनाचे अंदाजे ५४ क्विंटल सोयाबीन लंपास केल्याची घटना आज घडली. याप्रकरणी पातूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. कापशी रोड येथील अमोल खडसे यांच्या शेतीतील गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेले सोयाबीनचे ९० कट्टे अंदाजे ५४ क्विंटल (किंमत १ लाख ८९ हजार रुपये) अज्ञात चोरट्याने गोडाऊनचे कुलूप तोडून लंपास केले.


