अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
अकोला:- अवैध सावकारीप्रकरणी सहायक निबंधक सहकारी संस्थेकडून प्राप्त तक्रारीवरून पिंजर पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. सावरखेड येथील कल्पना बबन हिवराळे यांनी सहायक निबंधक सहकारी संस्था बार्शीटाकळी यांच्याकडे आरोपी आनंदा शिवराम मोहाडे (रा. शेंदुर्जना मोरे, ता मंगरूळपीर, जि. वाशिम) व रमेश साहेबराव देशमुख (रा. सावरखेड, जि अकोला) यांच्याविरुद्ध अवैधा सावकारीप्रकरणी तक्रार केली होती त्या अनुषंगाने चौकशी करून सहायक निबंधक महेंद्र यादवराव परतेकीयांनी पिंजर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.


