मराठवाडा विभाग प्रमुख:- शुभम उत्तरवार
कंधारच्या श्री संत साधू महाराज संस्थानची तीनशे वर्षा पासूनची परंपरा असलेली पंढरपूराकडे पायी जाणारी दिंडी याही वर्षी संस्थानचे आठवे वंशज मठाधिपती गुरुवर्य श्री ह.भ.प. एकनाथ महाराज साधू यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी चालक ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज साधू यांच्या नेतृत्वात टाळ-मृदुंगाच्या निनादात व विठोबा – रूक्माईच्या गजरात दि. १९ जुन रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
साधू महाराज संस्थान तर्फे तीनशे वर्षा पूर्वी सुरु करण्यात आलेली ही दिंडी ठराविक वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे निघायची, तेंव्हा पासुन आजतगायत अखंडीत पणे ही दिंडी सुरु आहे. कंधार येथून दोनशे-अडीचशे वारकरी घेउन निघणारी हि दिंडी पंढरपूरात पोंहचते तेव्हा पंचविस हजार पर्यंत पोहचते. मराठवाडयातील पहिल्या क्रमांकाची दिंडी व मानाची दिंडी म्हणून ओळखल्या जाते. प्रतीदिन २० - २५ कि. मी.अंतर पायी चालून दिंडी एकादशीच्या दिवशी पंढरपूरात दाखल होते. पायी दिंडीस जागो जागी चहा पाणी, नास्ता, जेवण, आरामाची सोय केली जाते. हि दिंडी
कंधार, लोहा,माळाकोळी, माळेगाव, सांगवी, अहमदपूर, शिरूर, चापोली, चाकुर, घरणी,भातखेडा, लातुर, साकरा, बोरगाव, मुरूड,ढवळाला, तडवळे, येडसी, घारी, जामगाव, बार्शी, म्हैसगाव, कुर्डूवाडी, कुर्मदास, आरण, आष्टी, आढीव, पंढरपूर अशी मार्गस्थ होणार आहे. १५ दिवसांचा पायी प्रवास व १४ रात्रींचा मुक्काम या काळात होणार आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही संस्थानचे आठवे वंशज मठाधिपती श्री.ह.भ.प.एकनाथ महाराज साधू यांच्या मार्गदर्शनाखाली व दिंडी चालक श्री ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज साधू यांच्या नेतृत्वात जेष्ठ कृ.अष्टमी ८ गुरुवार दि.१९ जुन रोजी दुपारी बारा वाजता श्री.संत साधू महाराज संस्थांन पासून सर्व वंशज मठाधिपतीच्या व देवदेवतांची आरती करून मार्गस्थ होणार आहे. आषाढ शु. ८ गुरुवार दि.३ जुलै रोजी ही दिंडी पंढरपूर येथे पोहचेल.या दिंडीत ज्या शिष्य भक्त भक्त मंडळींना सहभागी व्हायचे किंवा श्री संत साधू महाराजांच्या पादुकेचा अभिषेख करायचा आहे त्यांनी नोंदनी करावी असे आवाहन श्री संत साधू महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
या वर्षी चांदीच्या रथात निघणार पालखी
कंधार हुन पंढरपूकडे जाणाऱ्या परंपरागत श्री संत साधू महाराजांच्या दिंडीचे नवीन स्वरूपात पादुका पालखी या वर्षी चांदीनी बनवलेल्या रथात निघणार आहे. कंधार शहरातून मोठ्या जलोष्यात ही दिंडी पालखी सह (दि.१९ ) रोजी प्रस्थान करणार आहे. या साठी कंधार शहर व परिसरातील नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
लोहा येथे दि 19 गुरवारी पहिला मुकाम दत्त मंदिर येथे श्री संत साधू महाराज दिंडी या वर्षी
लोहा येथे आहे.


