विदर्भ विभाग प्रमुख:- युसूफ पठाण
पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे फिर्यादी नामे प्रकाश हरिभाऊ रोकडे रा नांदगाव जि. वर्धा यांनी तोंडी रिपोर्ट दिली की, दि. 31/03/2025 चे 07.30 वा दरम्यान फिर्यादी हे त्यांचे बोरगाव शिवारातील शेतात गेले असता त्यांना शेतातील बंड्यामध्ये ठेवलेल्या शेती ओलीत करण्याकरता ठेवलेल्या दोन मोटार पंप मोटार दिसून आले नाही. तेव्हा त्यांनी कोणीतरी अज्ञात चोरट्याने बंड्यातून बंड्याचे कुलूप तोडून 1)5Hp ची मोटार पंप की.25000 रु.,2) 7.5Hp मोटार पंप की 7000 रू असा जु. किं.32000रु चा माल चोरून नेल्या बाबत फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून अज्ञात आरोपीविरूध्द सदरचा गुन्हा नोंद असून सदर गुन्हयांतील तपास सुरू असताना आरोपी शोध कामी मा. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक सा. वर्धा, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सा. वर्धा यांच्या मार्गदर्शनात मा.रोशन पंडीत, उपविभागीय पोलीस अधीकारी सा, हिंगणघाट व मा. देवेंद्र ठाकुर, पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने दिनांक 09/06/2025 रोजी रात्र दरम्यान पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोबरे बक्र 1234,पो.ना राहुल साठे बक्र 859, पोशि/187 आशिष नेवारे, पोशि/794 मंगेश वाघमारे,हे त्याचे पथकासह पोस्टे परिसरात पेट्रेलिंग करीत असता नंदुरी कडून हिंगणघाट कडे एका पल्सर मोटर सायकलवर तीन इसम तोंडाला बांधून संशयितरित्या फिरताना दिसून आल्याने त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता
त्यांनी त्यांचे नाव 1) व्यंकटी मारुती दांडेकर वय 26 वर्ष रा. टेम्युर्डा 2) तुषार गहूजी पाल व 24 वर्ष राहणार टाकळी तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर 3) हेमंत विनोदराव चौधरी व 34 वर्ष राहणार शेगाव तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा असे सांगून त्यांच्या जवळील थैलीची पाहणी केली असता पहिली मध्ये लोखंडी कटर, स्क्रू ड्रायव्हर मिळून आल्याने त्यांना पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली असता त्यांनी दोन महिन्यापूर्वी हिंगणघाट नांदगाव येथील परिसरामध्ये मोटर पंप चोरी केल्याचे सांगितल्याने दोन्ही मोटर पंपबाबत आरोपी क्रमांक 03 चे शेतातील बंड्याची पाहणी केली असता दोन मोटर पंप मिळून आल्याने जप्ती पंचनामा कारवाई दरम्यान जप्त करून आरोपीता कडून 1) )5Hp ची मोटार पंप की.25000 रु.,2) 7.5Hp मोटार पंप की 7000 रू 3) एक बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल क्रमांक MH 34 CC 0415 की.1,00,000 रु 4) एक लोखंडी मोठे कटर की.600 रु 5) स्क्रू ड्रायव्हर की.100रु असा एकूण जुमला किंमत 1,32,700 रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.

