लातूर शहर प्रतिनिधी:- प्रशांत जाधव
दिनांक १०/०६/२०२५
रोजी रात्री 10 च्या सुमारास नॅशनल हायवे 365 वर महालक्ष्मी हॉटेल जवळ चाकुर चापोली रोडवर हरणाच्या मादा पाडसाला अज्ञात वाहनाने धडक देऊन जखमी केले,रात्री उशिरापर्यंत हरिण जखमी अवस्थेत रोडवर पडल्याची माहिती मिळताच लातूर चे प्राणी मित्र सदानंद मलीशे पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रथमोपचार केले.
त्यावेळी सदानंद पाटील यांच्या माहितीनुसार वनविभाग अधिकारी आकाश कातपूरे व चाकुर पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस करण गायकवाड यांच्या मदतीने तपासणी करून जखमी हरिणास वनविभागाच्या स्वाधीन केले.


