बुलढाणा जिल्हा प्रतिनीधी: – सुनील वर्मा
खामगाव :-खामगाव विधानसभा मतदारसंघाचे तीन टर्म आमदार माणून निवडून आलेले माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचा १२ जून रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी खामगाव नगरीमध्ये सुरु असून संपूर्ण खामगाव शहरांमध्ये कार्यकर्ता संकल्प मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्याचे बॅनर लावण्यात आलेले आहेत.
माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी कग्रेस पक्षाला राम राम ठोकून येत्या १२ जून रोजी जवळपास त्यांच्या हजारी समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षमध्ये प्रवेश करणार असून या दिवशी संपूर्ण मतदार संघामध्ये जवळपास २५ हजार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पढपाळींचा वितरण सुद्धा राष्ट्रवादी कविसच्या सदस्यांना करण्यात वेणार आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला व संकल्प मेळाव्याला महायुती मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील वरिष्ठ नऊ मंत्री उपस्थित राहणार असून खामगाव शहरांमध्ये कधी नव्हे असे यंदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद या ठिकाणी व शक्ती प्रदर्शन दिसून येत आहे.

