छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित त्रिवार मानाचा मुजरा!
रायगड जिल्हा प्रतिनिधी:-कैलासराजे घरत(खारपाडा पेण)
पेण तालुक्यातील खारपाडा गावात दरवर्षीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन तर्फे शिवस्मारक खारपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जलाभिषेक, दुग्धाभिषेक करून विधिवत पूजन करून शिवआरती, धेय्य मंत्र, प्रेरणा मंत्र गारद घेवून शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय! धर्मवीर संभाजी महाराज की जय !! राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा विजय असो !!
!! हिंदू धर्म की जय !! भारतमाता की जय !!
जय भवानी !! जय शिवराय !! हर हर महादेव !!
या गगनभेदी घोषणांनी आसमंत निनादून गेला होता सारे वातावरण शिवमय झाले होते. यावेळी जेष्ठ विधीज्ञ मनोहर पुंडलिक पाटील साहेब यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या सौ.भारतीताई मनोहर पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून पूजन केले तर शिवसेना पेण तालुका संघटक श्री.प्रशांत बाळकृष्ण घरत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिवकन्या कु.ओवी कैलास घरत हिने आपल्या पहाडी आवाजात गारद सादर केली.
पत्रकार कैलासराजे घरत यांनी उपस्थितांचे शब्दसुमनाने स्वागत केले आणि सर्वांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते, शिवशंभू चरित्र इतिहास अभ्यासक पत्रकार कैलासराजे घरत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की आज आपण शरीराने इथे असलो तरी मनाने प्रत्यक्षात किल्ले रायगडावरच शिवराज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित आहोत.
शिवरायांनी अठरापगड जातींना एकत्र करून रयतेचे स्वराज्य स्थापन केले.आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा राजा बत्तीस मण सुवर्ण सिंहासनावर आरूढ झाला. आणि रयतेला खऱ्या अर्थाने या स्वराज्याला छत्रपतींच्या रूपाने लोककल्याणकारी जाणता राजा मिळाला.म्हणूनच समर्थांनी शिवरायांचे वर्णन केले ते असे..
“शिवरायांचे आठवावें रुप । शिवरायांचे आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप । भुमंडळी ।।१।।
शिवरायांचा कैसें बोलणें । शिवरायांचे कैसें चालणें ।
शिवरायांची सलगी देणें । कैसी असे ।।२।।
सकल सुखांचा केला त्याग । म्हणोनि साधिजे तो योग ।
राज्यसाधनाची लगबग । कैसी केली ।।३।।
याहुनी करावे विशेष । तरीच म्हणवावें पुरुष ।
या उपरीं आता विशेष । काय लिहावेँ ? ।।४।।
शिवरायांसी आठवावें । जीवित तृणवत मानावें ।
इहलोकीं परलोकीं उरावे । किर्तीरुपें ।।५।।
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ।।६।।
।। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजीमहाराज की जय ।।
।। धर्मवीर छत्रपती श्री संभाजीमहाराज की जय ।।
छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील एकमेव राजे आहेत की त्यांच्या निर्वाणानंतर देखील ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा आज मोठ्या उत्साहात साजरा होतो यावरून शिवभक्तांचे रयतेचे महाराजांवरील असलेली निष्ठा आणि शिवप्रेम व्यक्त होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री.दत्तात्रेय जनार्दन घरत, श्री.देविदास रामा घरत, महिला अध्यक्षा सौ.मयुरी कैलास घरत, कु.हितेश घरत, तुकाराम ठाकूर आदी ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विजेते पत्रकार श्री कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी केले होते. अतिशय उत्साहात हा मंगलमय सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.
अखंड सेवेचे ठायी तत्पर.. शिवशंभू चरित्र इतिहास अभ्यासक पत्रकार श्री कैलासराजे निर्मला कमलाकर घरत..!

