अकोला विभाग प्रतिनीधी:- गणेश वाडेकर
अकोला जिल्ह्यात लवकरच बकरी ईद सण साजरा होणार आहे. या पार्शवभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच नागरिकांनी सण शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि एकोप्याने साजरा करावा, यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे अध्यतेखाली शांतता समितीची विशेष बैठकीचे ४ जुन रोजी पोलीस लॉन येथे आयोजन केले होते. या बैठकीस शांतता समीती सदस्य, सर्व धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्था, नागरिक, नगरसेवक व सर्व पोलीस अधिकारी, आणि पत्रकार बांधव उपस्थित होते

