लातूर जिल्हा प्रतिनिधी मोहसीन खान
लातूर: सध्या पावसाळ्याचे दिवस सूरु असून, मनपाचे सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तपाडे सरांना निवेदनाद्वारे सांगण्यात आले की, शहरातील अत्यंत गजबलेल्या वस्ताहतील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक उड्डाणपुलावर पाऊसाचे पाणी जमा होऊन ते पाणी पाईपद्वारे खालील बाजूस असलेल्या भुयारी मार्गात हे सर्व पाणी जमा होत आहे. यामुळे भुयारी मार्गात दोन्ही बाजूस येणाऱ्या-जाणाऱ्या रस्त्यामध्ये लांबसडक गुडघाभर पाणी सांचत आहे. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे ही अडचण एक दिवसाची नसून किमान चार महिने पावसाळा असल्यामुळे या अडचणीचा सामना लातूरकर दरवर्षी करत असून, साहेबांना विनंती करण्यात येत आहे की, भुयारी मार्गामध्ये सांचणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करुन सामान्य लातूरकरांना न्याय दयावा.त्याच बरोबर जिल्हा परिषद समोरील गवळी चौक मुख्य रस्ता (बार्शी रोड) ते ईदगाह चौक (बार्शी रोड) या ठिकाणी दरवर्षी पावसाळयामध्ये मोठया प्रमाणावर पाणी सांचत आहे. या ठिकाणी असलेल्या नाली पुर्णपणे तुंबलेल्या असून, पाऊसाच्या पाण्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
त्याच बरोबर गाडया स्लीप होऊन अनेक अपघात होत आहेत.तरी मे. साहेबांना विनंती करण्यात येते की, लातूर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊसाच्या पाण्यामुळे रस्ते ब्लॉक होत आहेत. वेळीच नाले सफाई करुन मुख्य रस्ते मोकळे करुन दयावेत, ही विनंती करण्यात आली यावेळी रणसम्राट युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण बामणकर, उपाध्यक्ष राचन्ना वांगी, सचिव दयानंद कलशेट्टी, कार्याध्यक्ष प्रविण साळुंके, कार्याध्यक्ष जयद्रथ शिंदे, विशाल भंडगे, संघटक प्रशांत गोरे, संघटक योगेश राठोड, मोहन गायकवाड, श्रीनिवास डुबणे, अविनाश गोखले, संकेत बामणकर, श्रीनिवास सरवदे, संतोष भोसले, आदित्य कोळी, ऋषिकेश सूर्यवंशी, ओम भंडगे, आदित्य भालेराव, निलेश राऊत, अभिषेक गायकवाड आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

