अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
अकोला येथील पथकाला गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली कि, पो.स्टे. खदान, अकोला हद्दीतील खोकेवाली चाळ येथे राहणारा ईसम नामे मोहम्मद अजहर शेख करीम हा त्याचे राहते घरी अंमलीपदार्थ गांजा विकी करिता बाळगुन आहे, अशा माहितीवरून रेड करून आरोपी नामे मोहम्मद अजहर शेख करीम वय ४५ वर्ष रा. खोकेवौली चाळ, खदान अकोला याचे घरातुन एकुण १ किलो ५२४ ग्रॅम ओलसर गांजा कि.अं. ३०,०००/ रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला वरून आरोपी विरूध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये कारवाई करून आरोपीस पुढील कारवाई कामी पो.स्टे. खदान अकोला यांचे ताब्यात देण्यातआले.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक सा., मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे सा, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला स.पो.नि. विजय चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखा अकोला व सहा. पोलीस उपनिरिक्षक राजपालसिंह ठाकुर, गणेश पांडे, पोलीस अमंलदार फिरोज खान, उमेश पराये, खुशाल नेमाडे, आकाश मानकर यांनी केली.

