अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
पोलीस स्टेशन – बोरगाव मंजू अकोला
मुर्तीजापुर उपविभागातील बोरगाव मंजू येथे कौटुंबिक कार्यक्रमात गोपाल पवार यांच्यावर चाकूने हल्ला करून खूनाचा प्रयत्न झाला. मंगल चव्हाण व संगीता पवार यांच्यावरही लोखंडी पाईप व दांडक्यांनी मारहाण करण्यात आली. घटना २४ मे रोजी घडली. प्रकरण गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार होऊन, अवघ्या २४ तासांत बजरंग चव्हाण, अर्जुन चव्हाण, पवन पवार व रोशन सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली. कारवाई पोनि अनिल गोपाळ यांच्या पथकाने केली.

