जिल्हा लातूर प्रतिनिधी मोहसीन खान ….
जिल्ह्यातील पहिल्या अतिदक्षता हॉस्पिटलचा 24 वा वर्धापन दिन सोहळा व अद्यावत नूतनीकरण करण्यात आलेल्या नविन विभागाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित राहून आरोग्य आस्थापनेचा शुभारंभ करत शुभेच्छा दिल्या. तसेच आजवर दिलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या अतिदक्षता हॉस्पिटलची सुरुवात 2001 मध्ये झाली असून लातूरचे पहिले अतिदक्षता रुग्णालय आहे. याची सुरुवात सिव्हिल हॉस्पिटल माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.हमीद चौधरी यांच्या दूरदृष्टी कल्पनेतून झाली. २००१ मध्ये लातूर येथे गंभीर रुग्णासाठी लागणारी सर्व वैद्यकीय साधने व काही तज्ञ डॉक्टरांचा अभाव व काळाची गरज म्हणून या रुग्णालयाची स्थापना झाली.
या रुग्णालयामार्फत सर्व प्रकारच्या गंभीर रुग्णांसाठी सेवा मिळत गेली व जनसामान्यांचे रुग्णालय म्हणून ते नावारूपास आले. आज येथे विविध अतीगंभीर रुग्णांचे निदान उपचार करून जीवदान देण्यात येते. गोरगरीब, शेतकरी, मजूर यांची आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून उपचार करण्यात येतात. नवीन विभागात मधुमेह व दुष्परिणाम उपचार केंद्र, २४ तास सोनोग्राफी लॅबस, २४ तास मेडिकल, अपघात विभाग कार्यरत असणार आहे.
प्रसंगी खासदार डॉ.शिवाजीराव काळगे, माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे, आमदार रमेश आप्पा कराड, प्रदेश सरचिटणीस बबनराव भोसले, अमोल पाटील, मोइजभाई शेख, अभय कदम, नागोराव पाटील, डॉ.रमेश भराटे, डॉ.दामोदर थोरात, तानाजीराव देशमुख, अमृता कोहळे, आनंद पवार, डॉ.होळीकर, मायाताई सोरटे, प्रदीप पाटील खंडापूरकर, डॉ.हमीद चौधरी, सौ.चौधरी, स्तुती उगीले, राघवेंद्र देशमुख, डॉ.इतपतगिरे, राजेंद्र मालू, डॉ. अरुणकुमार, डॉ.शेळके, डॉ. भट्टड, मकरंद गिरी, आदी डॉक्टर, स्टाफ मान्यवर उपस्थित होते.

