कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी किशोर जासूद
अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य हि सामाजिक संघटना राज्यभर लोकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करित आहे. या संघटनेची बैठक दिनांक 21/05/2024 रोजी कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे झाली या राज्यस्तरीय बैठकीत मा. शलमोन लोखंडे यांची कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.अमोल महापुरे होते.निवडीनंतर मान्यवरांच्या हस्ते शलमोन लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष मा.सौरभ भाऊ साठे,राज्य उपाध्यक्ष मा. परशुराम लोखंडे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.सुरेश चव्हाण, जिल्हा संपर्कप्रमुख मा.संदीप जाधव वस्ताद, जिल्हा कार्याध्यक्ष मा.जीवन साठे, हातकणंगले तालुका अध्यक्ष रोहित सुवासे, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


