यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी: – गणेश राठोड
यवतमाळ:- उमरखेड-महागाव विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार किसनराव वानखेडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून फुलसांगवी चे भूमिपुत्र अमोल व्हटगीरे यांची निवड झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून अमोल व्हडगिरे हे भारतीय जनता पक्षाचे किंगमेकर नितीन भुतडा यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. नवनिर्वाचित आमदार किसनराव वानखेडे यांचे कामकाज पाहण्यासाठी स्वियसहायक म्हणुन निवड करण्यात आली. सदरची निवड ही नितीन भुतडा यांनी केली. मतदार संघातील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध योजना, विकास कामे मार्गी लागणार आहेत. उमरखेड आणि महागाव तालुक्यांत समान निधी खर्च करण्यावर अधिक भर देतील अशा प्रकारची यावेळी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निवडी बद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.


