सातारा विभाग:- निलेश कोकणे (माण तालुका प्रतिनिधी)
माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री फक्कडराव चांडोले यांच्या सुविध्य पत्नी सौ. सुधा फक्कडराव चांडोले यांचे बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सांगोला (सोलापूर ) येथे निधन झाले. निधनासमई त्यांचे वय 79 वर्ष होते. त्यांच्या पश्चात पती. 2 मुले. 2 मुली. सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.सौ. सुधा चांडोले यांना जिल्हा परिषद आदर्श शिक्षिका पुरस्कार. जिल्हा परिषदेतर्फे दिला जाणारा रत्नाई पुरस्काराच्या पहिल्या मानकरी ठरल्या. तसेच पहिल्या तालुका मुख्याध्यापिका. श्री राम भजनी मंडळाच्या सदस्या म्हणून त्यांचा नावलौकिक होता.त्यांचे अनेक विध्यार्थी आज मोठया पदावर कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आणि प्रत्येकाला मदत करण्यासाठी सतत पुढे येत असत.त्यांचा स्वभाव खूप मनमिळाऊ आणि समजूतदार होता. संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना सामाजिक कार्य निःस्वार्थ पणे करण्याचा बहुमोल शुभ संदेश आहे.नेहमी त्या प्रत्येकाच्या सुख दुःखाच्या सामील होत होत्या. या माय माऊलीच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला या दुःखातून सवारण्याचे बळ देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

