अकोला विभाग प्रतिनीधी: – इम्रान खान सरफराज खान
- राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग महानगर अध्यक्षांचा आरोप*
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचेज्येष्ठ नेते माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर यांचा १३ फेब्रुवारी रोजी शिवनी विमानतळा नजीक अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळेस मोबाईल त्यांच्या जवळ होता. याचा तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करत आहेत. मात्र महिना होत आला तरी अद्याप प्रा. तुकाराम बिडकर यांच्या मोबाईलचा शोध पोलिस लावू शकलेल नाही. पोलिस अपयशी का ठरत आहेत असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग महानगर अध्यक्ष अनिल मालगे यांनी केला आहे.
सीसीटीव्ही फुटेज मध्ये अपघात दिसतो. त्यामुळे पोलिस यंत्रणेला मोबाईल कोणी नेला याचा शोध लावण्यास मदत होते. तरीपोलिस त्यांच्या मोबाईलचा शोध का लावत नाही. मोबाईलचा शोध लवकरात लवकर लावून द्यावा. अन्यथा राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना निवेदन देण्यात येईल. माजी आमदाराच्या मोबाईलचा शोध लावण्यास पोलिस एवढा उशीर लावत आहेत तर सर्वसामान्य नागरिकांचे काय असे अनिल मालगे यांचे म्हणणे आहे.

