महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांना विजयी करा.
अर्जनी मोरगांव प्रतिनिधी:-प्रितम कुंभारे भंडारा
विरोधकाकडे न विकासाचे व्हीजन आहे न, केलेल्या विकासकामांचा लेखा जोखा आहे त्यामुळे जनतेची दिशाभूल करने हेच त्यांचे काम आहे, त्यातूनच संविधानाला धोखा आहे असा फेक नरेटीव निर्माण करण्याचे काम केला जात आहे, परंतु विश्वरत्न परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेला संविधान कोणीही बदलू शकत नाही, हे अटळ सत्य आहे, अशी ग्वाही खा. प्रफू्ल पटेल यांनी दिली, तसेच ते म्हणाले महायुती सरकार ही शाह, फूले, आंबेडकर यांची विचारधारा कधीही सोडनार नाही. क्षेत्रासह जिल्हाचा विकास आम्हीच घडवू म्हणुन जनता ही आमचा पाठीशी उभी राहणार आहे, महायूतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांना बहुमताने विजयी करावे असेही आवाहन त्यांनी केले.

अर्जूनी मोरगांव विधानसभा क्षेत्राचे महायूतीचे उम्मीदवार राजकुमार बडोले यांच्या सार्वजनिक रंगमंच, धाबेपवनी या ठिकाणी आयोजीत सभेला संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी सर्वश्री प्रफुल पटेल, राजकुमार बड़ोले, यशवंत गनवीर, सरस्वताताई चाकोटे, दीपक कुंभरे, भीमराव चर्जे, सरिताताई लंजे, तुलाराम भाऊ आदी उपस्थित होते

