अकोला विभाग प्रतिनीधी: – इम्रान खान सरफराज खान
अकोला : दावत-ए-इस्लामी इंडियातर्फे शुक्रवार 21 फेब्रुवारी रोजी जश्न पॅलेस ग्राउंड वाशिम बायपास रोड अकोला येथे संध्याकाळी 5:00 ते 10:00 या वेळेत इस्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. या इस्तेमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. की 85 विद्यार्थ्यांना हाफिज आणि नजर ही पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी मोठ्या धार्मिक नेत्यांसह आमदार साजिद पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या इस्तेमामध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. या इस्तेमाची सुरवात प्रार्थनेने झाली.


