अकोला विभाग प्रतिनिधी इम्रान खान सरफराज खान
स्थानिक फिरदौस कॉलनी येथील रहबर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स संचालित अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप( सेण्डऑफ) कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अध्यासन अधिकारी (माध्यमिक) डॉ.सुचिता पाटेकर मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात तिलावत-ए-कुराण पाकने झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अँग्लो उर्दू हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक जमीर खान सर यांनी केले. इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी शकील अहमद खान सर यांनी बनवलेला एक विशेष माहितीपट दाखवण्यात आला ज्यामध्ये मुलांच्या जीवनात वडिलांचे महत्त्व विशद करण्यात आले. जो बाप आपल्या मुलांवर अपार प्रेम करतो, त्यांच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करतो आणि त्या बदल्यात कशाचीही अपेक्षा करत नाही.
यावेळी शाळेच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याच्या वडिलांचा विशेष स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला, ज्याचे आदरणीय पाटेकर मॅडम आणि मंजूर नदीम साहब यांनी देखील कौतुक केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश व प्रसिद्ध कवी मंजूर नदीम साहब, फ्लाइंग कलर्स रोटी बँकेचे डाॅक्टर जुबेर, जावेद अहमद खान, श्रीराम गुड्स गॅरेजचे संचालक आणि सचिव, ख्वाजा इफ्तेखार अहमद, सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षणतज्ज्ञ, श्री. शकील खान उपस्थित होते संस्था राहबर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.तहसीन हसन मॅडम व रहबर कनिष्ठ महाविद्यालय, कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य काशिफ जमाल खान, रहबर महिला महाविद्यालयाचे प्राचार्य मोहम्मद अबरार हुसेन सर, विदर्भ तंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव बोराडे, महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद जोधे, महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद जोशी, मोरे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुबेर अहमद सर यांनी केले तर आभार तहसीन हसन मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

