अकोला विभाग प्रतिनिधी इम्रान खान सरफराज खान
अकोला:अकोल्यातील नायगाव परिसरातील शाहनवाजपुरा येथे रात्री 3 ते 4 च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने कबुतराच्या पिंजऱ्याला आग लावली. या आगीत सुमारे 50 ते 60 कबुतरे होती त्यातील 22 कबूतरे जिवंत जळून खाक झाली. रसूल खान नावाच्या व्यक्तीच्या कबुतरांच्या पिंजऱ्यात ही आग लागली. विशेष म्हणजे जिथे आग लागली तिथे पेट्रोलची बाटलीही दिसत आहे. अखेर ही आग कोणी लावली हा प्रश्न कायम आहे?
याप्रकरणी फिर्यादी रसूल खान यांनी अकोट फाइल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र या घटनेची माहिती मिळताच गस्त घालणारे पोलीस कर्मचारीही पहाटे पाच वाजता पोहोचले. घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास अकोट फाइल पोलिस करत आहे.

