यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :-कैलास कोडापे
राळेगाव तालुक्यातील आपटी(रामपुर)गावात नव शिव शक्ती मंडळ आपटी (रामपुर )यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिव छत्रपती महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि प्रमुख पावणे व लहान मुलापासून ते मोठ्या स्त्री पुरुषा परंत्य हजर होते.
सर्वप्रथम कार्क्रमाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष व प्रमुख पावणे यांच्या हस्ते शिव छत्रपती महाराज यांच्या प्रतिमेचे पूजेन करून फुलांचा हार अर्पण केला. त्यानंतर लहान मुला -मुलींचे भाषणाचा कार्यक्रम सुरु झाला. सर्व प्रथम शाश्वती वांगे, देव्यानी देशमुख, श्रावणी हुलके, वैष्णवी वांगे, भाविका वांगे, रिया पिपंरे, वेदिका वांगे, अंशिका नेहारे, श्रावणी हुलके,

तेजु टोळे, गणेश हुलके, तुषार जांभुरकार, प्रथमेश मडावी, सानिका देशमुख, रुचिता पटेलपैक, श्रुती पटेलपैक या सर्व मुला -मुलींनी भाषणात सहभाग घेतला होता,आणि कार्यक्रमाचे संचालन प्रतीक्षा देशमुख यांनी केले.
त्यानंतर श्री. ह. प. गजानन सुरकर(महाराज)सावंगी (पेरखा) यांच्या कीर्तनचा कर्यक्रमाला सुरुवात झाली. तसेच उत्कृष्ट गायक नरेश महाजन महाराज, पिंपळगाव,व तसेच लाभलेले हार्मोनियम वादक भारत महाराज मेश्राम आटमुर्डी, उत्कृष्ट तबला वादक पवन महाराज दडांजे सावनेर, आणि सह गायक श्री पांडूरंग उइके वाढोणा (बाजार ) हजर होते.
आपटी(रामपुर )गावातील शिव शक्ती मंडळ आपटी (रामपुर )यांनी खूप परिश्रम घेतले अशा प्रकारे शिव छत्रपती महाराज्यांची जयंतीचा कार्यक्रम सर्व गावाकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.

