वर्धा विभाग प्रमुख:- युसूफ पठाण
आष्टी नगरपंचायत मध्ये होणाऱ्या स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीवर जनशक्ती संघटनेचा बहिष्कार
आष्टी(शहीद)
सर्व पत्रकार बंधूंना कळविण्यात येते की,आष्टी नगरपंचायत मधे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, जनशक्ती संघटना व इतर मित्र पक्षांनी मिळून आष्टी शहराच्या विकासाला केंद्र बिंदू मानून आष्टी शहराचा कायापालट करण्याचे हेतूने सरकार स्थापन केले जनशक्ती संघटना आष्टी तालुका यांनी उपाध्यक्ष पद व अन्य दोन सभापती पदे घेऊन सत्तेमध्ये सहभागी झाले यामध्ये जनशक्ती संघटना यांनी सामाजिक दायित्व जपून आष्टी शहरातील प्रत्येक प्रभागाचा विकास व्हावा या प्रामाणिक हेतूने सत्तेत सहभाग घेतला. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या त्यांच्या प्रश्नांना विविध आंदोलनाचे माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावले सामाजिक कामे करणारी ख्याती जनशक्ती संघटनेची आहे.

व त्याच कामाची पावती म्हणून जनसामान्य नागरिकांनी जनशक्ती संघटनेचे नगरसेवक यांना निवडून दिले. परंतु सत्ता स्थापन होऊन तीन वर्षाचा कालावधी झाला. या कालावधी दरम्यान आष्टी शहरातील पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न सोडून कोणतेही विकासात्मक कामे झालेली नाही व समोर कामे होईल असे वाटत नाही खुद जनशक्ती संघटनेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या प्रभागातही कोणतीही काम झालेले नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन नगरपंचायत आष्टी मध्ये जनशक्ती संघटनेचे उपाध्यक्ष व दोन सभापती आज दिनांक १८/०२/२०२५ रोजी यांनी राजीनामा दिलेला आहे.
सत्तेबाहेर राहून विविध आंदोलने करून आष्टी शहरातील विविध विकास कामे, प्रलंबित कामे व सर्व प्रश्नांना न्याय मिळवून देईल अशी हमी संघटनेतर्फे दिली आहे.
विकी माहुरे ( जनशक्ती संघटना ता. अध्यक्ष
पवन गुल्हाने जनशक्ती संघटना ता. उपाध्यक्ष
कार्तिक भोंडे जनशक्ती संघटना शहर अध्यक्ष

