वर्धा विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
दिनांक 10/02 2025 आणि 11/02/2025 ला दरवर्षीप्रमाणे दोन दिवस गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये स्पोर्ट डे मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित मा. शरद बोके अध्यक्ष स्वामी विवेकानंद सेवा शिक्षण संस्था आशिष मानकर मुख्याध्यापक गुरुकुल पब्लिक स्कूल वसंत बारंगे पर्यवेक्षक, महेश ढोले ,रितिक कालोकर प्रतिनिधी नागपूर विद्यापीठ कबड्डी संघ इत्यादी प्रमुख मान्यवर मंडळी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बजरंगबलीच्या फोटो पुजनाने करण्यात आली.
संपूर्ण भारतात मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त स्पोर्ट डे साजरा केला जातो. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मा.बोके सरांनी तसेच चोपडे सरांनी आपल्या भाषणातून खेळांचे महत्त्व तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये शिस्त विकसित व्हावी आणि शिस्तीबरोबरच एकाग्रता सुद्धा विकसित व्हावी याकरिता खेळ किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबरच खेळ सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो त्याकरिता शाळेमध्ये वेगवेगळ्या खेळांचे स्पोर्ट डे निमित्त आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रनिंग रेस ,बलून रेस ,वॉटर बॉटल फिलिंग रेस, लेमन स्पून रेस ,बलून रेस ,सॅक रेस, थ्री लेग रनिंग रेस इत्यादींचा समावेश होता. या सर्व स्पर्धेमध्ये वर्ग नर्सरी ते वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी भरगच्च सहभाग नोंदविला. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी खेळांचा आनंद घेतला. या सर्व स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता संस्थेचे सर्व पदाधिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद इतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

