वर्धा प्रतिनिधी:- विधानसभा निवडणुकीचे
सर्व पक्ष व उमेदवार कामाला लागले. पण यातही चर्चा आहे ती अपक्ष उमेदवार डॉ. सचिन पावडे यांची. अगदी सुरुवातीपासूनच बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन पावडे यांनी समाजकारणासोबत राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत.
नामांकन रॅलीला मिळालेला वर्धेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असो की प्रचार रॅली… त्यांच्या सर्वच सभा आणि रॅलीला समाजातील प्रत्येक वर्गाने उचलून धरले आहे.
निवडणूक चिन्ह पण त्यांना खूप साथ देताना दिसत आहे. प्रचार रॅली ज्या भागातून जाते तिथे शिट्टीचा आवाज सर्वत्र पसरतो आणि त्यात लहान मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
ग्रामीण संवाद यात्रेला गावाकऱ्यांकडून मिळत असलेला प्रतिसाद प्रचंड आहे. त्यामुळे
विरोधकांना या ‘शिट्टी’चा आवाज जागते रहो… जागते रहो सारखा भासत असेल, असे त्यांच्या कार्यकर्त्यांचे
म्हणणे आहे.

वर्धा शहर आणि ग्रामीण भागातील सर्वच जाती धर्म आणि सर्वच प्रवर्गाला अपक्ष उमेदवार डॉ. सचिन सुरेशराव पावडे जनता जनार्दनाचा आपला उमेदवार म्हणून प्रसिद्धी मिळत असल्याचे ते सांगतात. याशिवाय वर्धा शहरातील अनेक डॉक्टर्स मंडळी, वकील, सी. ए., प्रसिद्ध व्यावसायिक, प्रतिष्ठित नागरिक सोबतच इतर प्रभागातील तरुण मंडळी, महिला तसेच मतदार क्षेत्रातील मतदारांचा प्रचार रॅलीला वाढता पाठिंबा बघता वर्धा शहरातील सामाजिक संघटना त्यांच्याशी जुळत असल्याचे चित्र आहे.

