इम्रान खान सरफराज खान:- अकोला विभाग प्रतिनिधी
अकोला आणि अमरावतीतील ‘बांग्लादेशी नागरिकत्व प्रकरण’ चर्चेत महाराष्ट्र भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जिल्ह्यात बोगस नागरिकत्व प्रमाणपत्रे दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. अकोला जिल्ह्यात 15,845 बांग्लादेशींना बोगस प्रमाणपत्रे मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासंदर्भात आज त्यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची भेट घेतली.सोमय्यांच्या म्हणण्यानुसार, अमरावती, भिवंडी, मालेगाव आणि अन्य जिल्ह्यांतही मोठ्या प्रमाणावर बांग्लादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना बनावट दाखले मिळत आहेत. त्यांनी यामागे महाविकास आघाडीवर ‘वोट जिहाद’ घडवून आणल्याचा आरोप केला आहे.


