वर्धा विभाग प्रतिनिधी:- युसूफ पठाण
लालबाग गणेश मंदिर ट्रस्ट संत ज्ञानेश्वर नगर आर्वी नाका वर्धा तर्फे श्री शिव महापुराण कथा दिनांक २५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ पर्यंत वेळ सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत कथा प्रवक्ते लहरी बाबा कृपांकित परमपूज्य आचार्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्य जी महाराज मदापुरी अकोला यांच्या अमृतवाणीतून आयोजित करण्यात येईल.
गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. .माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो
या प्रसंगी बुद्धीचा स्वामी गणेशाचा जन्म दिवस साजरा केला जातो.
यावर्षी सुद्धा गणेश जयंती चा कार्यक्रम १ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित आहे कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी ६ ते ७ अभिषेक, सकाळी ८ ते १० होम हवन, सकाळी ११ ते १ काल्याचे किर्तन, ह.भ.प. निखिल महाराज काळे हिंगणघाट यांच्या अमृतवाणीतून, दुपारी १ ते ३ मिरवणूक पालखी, सायंकाळी ५ ते ९ महाप्रसाद, तसेच श्री शिव महापुराण निमित्य सामाजिक कार्यक्रम मंगळवार दिनांक २८ जानेवारी २०२५ वेळ १० ते २ भव्य रक्तदान शिबिर, बुधवार २९ जानेवारी २०२५ वेळ १० ते २ नेत्र तपासणी शिबिर, गुरुवार २९ जानेवारी २०२५ वेळ १० ते २ आरोग्य तपासणी शिबिर तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याकरिता लालबाग गणेश मंदिर ट्रस्ट वर्धा तर्फे आव्हान करण्यात येत आहे.


