कैलास राजे घरत :- खारपाडा प्रतिनीधी
थोरले महाराज फर्जंद शहाजी महाराज साहेब यांचा स्मृती दिन. 23 जानेवारी 1664 रोजी थोरले महाराजसाहेबांचे निधन झाले. त्यांची समाधी मुंबई-बंगलोर राष्ट्रिय महामार्गावरील दावणगिरी पासुन 50 कि.मी. आत होदगिरि या गावी आहे. महाराजसाहेब यांचा जन्म पराक्रमी मालोजीराजे व उमाबाई राणीसाहेब यांच्या पोटी झाला.पराक्रमी व मुत्सद्दी मालोजीराजे व विठोजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली आपली कारकिर्दिची सुरुवात केली ते त्यानी मागे कधी पाहिलेच नाही. इ.स. 1610-11 मध्ये राजेलखुजीराव जाधवराव यांची कन्या जिजाऊ यांच्यासोबत देवगिरीवर संपन्न झाला.
त्यानंतर मुस्लीम शाहीच्या राजवटीत मराठ्यांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी राजेलखुजीराव व शहाजी महाराजसाहेब यानी विरोधाचा गनिमीकावा करुन मराठ्याना उर्जितावस्था मिळवुन दिली परंतु इतिहासकारानी या विरोधाच्या गनिमीकाव्याचे विडंबन वैमनस्यात करुन टाकले. 25 जुलै 1629 रोजी या गनिमीकाव्याचा एक मोती निजामाने निखळवला परंतु शहाजीमहाराजसाहेब न डगमगता धीरोधात्तपणे व सावधतेने पाऊले टाकत मोगलाच्या अधिपत्याखाली जाधवरावानी खतम केलेल्या निजामाच्या घराण्यातील एका निजाम बालकास मांडीवर बसवुन तब्बल 3 वर्ष स्वतंञ राज्यकारभार केला.

यातून त्यांचा दुरद्रष्टीता आणी आपल्या भुमिला गुलामगिरीतुन मुक्त करण्याचे गुण दिसतात म्हणजेच स्वराज्याचे संकल्पक शहाजी महाराजसाहेबच हेच इतिहासकार विसरले. पहिला प्रयत्न फसला परंतु दुसऱ्यांदा माञ त्यांचे दोन बलाढ्य पुञ संभाजीराजे व बालशिवबाराजे आणी जीजाऊ ( या स्वराज्याच्या प्रेरणास्थान) होत्या.
जुलमी मुस्लिम राजवटीला गुंगारा देत व विरोधाचा गनिमीकावा करत एक नाही दोन स्वराज्याची बीजे पेरली,जोपासली व वाढविण्यासाठी आपल्या बलाढ्य पुञाना मोलाचे योगदान दिले तरीदेखिल इतिहास या अशा महान,मुत्सद्दी,पराक्रमी,धीरोदात्त, आणी दोन स्वराज्याचे संकल्पकाकडे कानाडोळा करतो. त्यांची युद्धनिती, राजनिती, न्यायनिती, 17 भाषेवरील निर्विवाद प्रभुत्व, कुशल गनिमीकावा , दूरदृष्टी आणी कुशल संघटन कौशल्य या आणी असंख्य गुणामुळे मराठ्यांची 2 स्वराज्य उभी राहिली.ज्या भुमीत मराठ्याना श्वास घेण्यासाठी मुक्तता नव्हती त्या भुमीत मराठ्यांची दोन स्वतंञ स्वराज्य उभी राहीली
त्याचे प्राथमिक श्रेय हे शहाजी महाराजसाहेब यानाच जाते. त्यानी मोगल,निजाम आणी आदिलशाही या तीनही राजवटीच्या अधिपत्याखाली कार्य केले परंतु लक्ष एकच होते मराठ्यांचे संघटन आणी हिंदवी स्वराज्यनिर्मिती. तसेच सतत व्यस्त असुनही बालशिवबाराजे व आऊसाहेब यांनी वाढवलेल्या स्वराज्याची घडी, बालशिवबाराजे यांचे शिक्षण याची जबाबदारी लिलया पार पाडली.
बालशिवबाराजे यांचे खेडेबारे येथे असताना महाभास यांची शिक्षक म्हणुन नेमणुक करुन आऊसाहेबांच्या देखरेखीखाली सुरु केले आणी इ स 1638 ते 1642 या काळात बालशिवबाराजे व आऊसाहेबाना बंगलोर येथे बोलावुन पुढच्या शिक्षणाची जातिने लक्ष देऊन पुर्ण केले याच्या शिवभारतात नोंदी आहेत. तसेच याच काळात पुणे येथे महाराजसाहेबानी बालशिवबाराजे व आऊसाहेबासाठी लालमहाल बांधुन घेतला आणी इ.स. 1642 मध्ये पुणे परगण्यात बालशिवबाराजे यांच्या दिमतीला आपले सर्वोत्तम माणसे दिली. “एक सर्वोत्तम पिता,सर्वोत्तम पती, सर्वोत्तम स्वराज्यसंकल्पक ,सर्वोत्तम राजा आणी सर्वोत्तम योद्धा कसा असावा याचे एकमेव उदाहरण म्हणजेच शहाजीमहाराजसाहेब, त्यांच्या स्मृती दिनानिमित्त मानाचा ञिवार मुजरा आणी विनम्र अभिवादन!!”
स्वराज्यसंकल्पक शहाजीमहाराजसाहेब याना कोटी कोटी प्रणाम…!!
जय शहाजीराजे! जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभुराजे !! शिवशंभू चरित्र इतिहास अभ्यासक, दूर्गसेवक,सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विजेते पत्रकार शिवश्री कैलासराजे निर्मला कमलाकर घरत.


