चौघेही अकोट फाईल येथील रहिवासी…
अकोला विभाग प्रतिनीधी: – इम्रान खान सरफराज खान (बार्शीटाकळी)
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दि १२ जानेवारी रोजी दुपारी अकोल्यातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या धक्काजवळ गाडी सिज करण्यावरुण हाणामारी झाली, त्यात चाकूचा वापर करून या चाकूच्या मारामारीत जिया अहमद सईद अहमद ४९, फैजान अहमद जिया अहमद २२, दोघेही १६०० प्लॉट अकोट फाईल अकोला इरफान अहमद सईद अहमद ३८, व इम्रान अहमद जाफर अहमद २४, दोघेही ताज चौक इंदिरा नगर अकोट फाईल असे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. इरफानची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास रामदासपेठ पोलीस करत आहेत.


