भंडारा विभाग प्रतिनीधी: – प्रीतम कुंभारे
मोहाडी 12 जानेवारी 2025*
माझ्या मतदार संघातील माता भगिनी यांही राजमाता मा जिजाऊ सारखे आपल्या मुलांन्हा घडविण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन आमदार राजूभाऊ कारेमोरे यांही, आज मोहाडी येथे जनसंपर्क कार्यालयात राजमाता जिजाऊ मा साहेब यांच्या जयंती निमित्त केले. तसेच मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकून कार्यकर्ते यान्हा मार्गदर्शन केले.राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याधा्यक्ष प्रफुलभाई पटेल, राज्यध्यक्स सुनिलजी तटकरे, यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी नेते राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष नाना पंचबुधे यांच्या मार्गदर्शनात स्वराज्य जननी राजमाता माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती कार्यक्रम पार पडला.

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मोहाडी तालुका तर्फे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची 12 जानेवारी ला आमदार राजूभाऊ कारेमोरे यांचे जनसंपर्क कार्यालय मोहाडी येथे साजरी करण्यात आली,कार्यक्रम अध्यक्षस्थानी तुमसर मोहाडी विधानसभा आमदार राजू कारेमोरे होते तर प्रमुख उपस्थितीत मोहाडी तालुका राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे, जिल्हापरिषद सदस्य महादेव पचघरे, आनंद मलेवार, नरेश ईश्वरकर, सभापती रितेश वासनिक, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायधणे,मोहाडी शहर अध्यक्ष पवन चव्हाण, नगरपंचायत उपाध्यक्स सचिन गायधणे, नगरसेवक शैलेश गभने, सुमनताई मेहर, वंदनाताई पराते, रेखाताई हेडाऊ, देवकांत पराते,पंचायत समिती सदस्य जगदीश शेंडे, प्रीतीताई शेंडे, वंदनाताई सोयाम, आशाताई बोन्द्रे, उमेश भोंगाडे, बाणा सववालाखे,तालुका युवक अध्यक्ष रोहित बुरडे,हर्सल गायधणे, आकाश गायधणे, विजय गायधणे, जिल्हापरिषद सर्कल प्रमुख, प्रदीप बुराडे, परमेश्वर नलगोपुलवार, व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते प्रमुख्याने उपस्थित होते.


