वर्धा विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
कारंजा : तालुक्यातील जि.प. उच्च प्राथ. शाळा सुसुंद्रा येथील विद्यार्थ्याची तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. प्राथमिक मुले कबड्डी प्रथम, बँड पथक संचलन प्रथम, नाटिका द्वितीय, १०० मीटर धावण्यात तनिश्री लाहाबर द्वितीय क्रमंकाच बक्षिस मिळविले. यामध्ये बँड पथक मार्गदर्शक सुंदरसिंग साबळे सारंग यावलकर यांनी केले. नाटिका मार्गदर्शक विनोद जाधव, नितीन धांडे, कबड्डी विनोद ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले.
तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेच आयोजन मॉडेल हायस्कूल कारंजा येथे करण्यात आले होते. बक्षिस वितरण कार्यक्रम आज घेण्यात आले. बक्षिस वितरण मा. ठाणेदार साहेब कारंजा ये होतें तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डोंगरदेव सर व प्रमुख अतिथी पंकज तायडे गटशिक्षणाधिकारी हे होतें. यशाबदल अभिनंदन नितीन धांडे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती गावकरी, अंगणवाडी ,ग्रामपंचायत व शिक्षण विभाग पंचायत समिती यांनी केले.


