पुणे विभाग : सचिन दगडे.
पुणे : गेल्या काही दिवसांपासुन सायबर क्राईम च्या गुन्हे मध्ये वाढ होत असताना पुण्यातील एका महिलेची नोकरी लाऊन देतो असं बोलुन तब्बल 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली .
पुनम मिश्रा ( वय : 29 रा.वारजे माळवाडी )सदर गेल्या महिन्यात त्यांना नोकरी लाऊन देतो या आश्वासनाने आरोपी प्रवीण कुमार ( राहणार मुळ.दाबर जि. बारमर राजस्थान )यांनी त्यांच्याकडून सतत काही रक्कम घेतली , त्यावेळेस त्यांनी तब्बल 50 हजार रुपये आरोपी ला दिले,रक्कम देऊन सुद्धा आपल्याला जॉब लागला नाही, त्यावेळेस महिलेने त्या संदर्भात चौकशी केली असती आरोपी ने उडवा उडवी ची उत्तरे दिले, तुमची रक्कम तुम्हाला देणार नाही ; तुम्हाला काय करायच आहे ते करा अशी धमकी दिली ‘ महिलेने आरोपी कडे वारंवार पैसे मागणी केली असताना तो टाळाटाळ करु लागला, काही दिवसांनी आरोपी चे कॉन्टॅक्ट बंद येऊ लागले असताना आपली फसवणूक झाली आहे असं लक्षात येताच महिलेने नेशनल सायबर क्राईम डिपार्टमेंट ला तक्रार नोंदवली आहे.

