विदर्भ विभाग :- गणेश वाडेकर
लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या केल्याची घटना खरपी येथील शेतात उघडकीस आली. शेतात हे दोघेही रखवालदार म्हणून कामाला होते. चांदूर बाजार तालुक्यातील सिरसगाव पोलीस स्टेशन हद्दीतील खरपी शेतामध्ये एका झोपडीत महिला मृत अवस्थेत मिळाली, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार ठाणेदार महेंद्र गवई आणि पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. रक्ताच्या थाराळात सापडलेली पोलिसांनी मृत महिलेची ओळख मध्य प्रदेशातील सुनंदा लाखन ठाकरे अशी केली. तपास पोलीस करत आहेत.

