वर्धा विभाग
वर्धा : स्थानिक अनिकेत
कॉलेज ऑफ सोशल वर्क येथे ग्रंथालय विभाग, मराठी भाषा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाअंतर्गत १ ते १५ जानेवारी पर्यंत वाचन पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


या कार्यक्रमांतर्गत सामूहिक वाचन, पुस्तक प्रदर्शन, वाचन कौशल्य कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन अशोक आकुलवार तर सामूहिक वाचन या कार्याक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.
अरविंद पाटील, ग्रंथपाल डॉ. मिलींद घंगारे, रासेयो कार्यकम अधिकारी डॉ. रवींद्र सहारे, प्रा. रूपेश कुचेवार, डॉ. राम सवणेकर, डॉ. लोकेश नंदेश्वर यांच्या उपस्थितीत झाले.अध्यक्षीय भाषणात डॉ. अरविंद पाटील म्हणाले, वाचन संस्कृती वाढविण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने उपक्रम हाती घेतला आहे. त्याचा उद्देश वाचनाचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे, तरूणपिढीचे पाऊल ग्रंथालयाकडे वळले पाहिजे, असा असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ. कमलेश मानकर, डॉ. कल्पना बंडीवार, डॉ. योगेश मुनेश्वर, डॉ. प्रशांत शंभरकर, संजय वानखेडे यांची उपस्थिती होती. कार्यकमाच्या यशस्वीतेकरिता महेंद्र जवादे, गौतम मून, मिलिंद डोंगरे, नंदकिशोर भैसार आदींनी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक करीत आभार डॉ. मिलिंद घंगारे यांनी मानले.



