अकोला विभाग् प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
जिल्ह्यातील चोहट्टा बाजार येथील एका बार मध्ये मोबाईल चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला असून दारूपिण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाने हा मोबाईल लंपास केला आहे. वाईन बारच्या काउंटरवरून या चोरट्याने हा महागडा आयफोन कंपनीचा सव्वा लाखाचा मोबाईल लंपास केला. चौकटीचा शर्ट घातलेल्या व्यक्तीने काउंटर वरील मॅनेजरला बोलण्यात गुंग ठेवीत आपली हात सफाई करीत आयफोन कंपनीचा एक लाख पंचवीस हजार किमतीचा महागडा मोबाईल लंपास केला आहे. याबाबत बारमालकाने पोलिसात तक्रार दिली असून पोलिस आता या चोरट्याचा शोध घेत आहेत.


