वर्धा विभाग:- युसूफ पठाण
सार्वजनिक बांधकाम अभियंता यांना वारंवार सांगण्यात आले बालाजी हॉटेल सामोरेल तसेच डॉ. चांडक यांच्या समोरील चौरस्तावरील नाली हे अतिशय उंच झाली असता आणि रस्त्याची तळबाजू खालावली असता त्यावरील रस्ता ते चौफुली हे अतिशय उंचावर गेले होते त्यामुळे तेथे कित्येकच महिलांच्या स्कूटरचे अपघात झाले महिलांचा गाडीवरील समतोल न सांभाळल्याने वृद्धांना व महिलांना दुखापत सुद्धा झाले तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या बनवल्या गेलेल्या पुलावर दुर्लक्ष केले यामुळे त्यांना वारंवार सांगितले आवेदन निवेदन झाले असता तरीसुद्धा त्यांनी भीम आर्मीच्या आग्रहाच्या विनंतीला फ्लावर समजून दुर्लक्ष केले त्यामुळे भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे व समस्त कार्यकर्ते पुलगाव करांनी पुलाचे गट्टू काढून सध्या पुरता तो रस्ता बंद केले .- आणखी अपघात टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी पूल बांधकाम करिता वेळ देण्यात आले लवकरात लवकर त्या पुलाचे सहनियोजन पणे काम करावे .भीम आर्मीचा प्रश्न इंजिनियर , व ठेकेदार यांना ठेके कसे मिळतात ज्यांना पूल बांधता येत नाही ते खरंच रस्ता बांधणार का ? जनतेच्या जीवावर पोट भरणारे येथील स्वार्थी पुढारी ,कर्मचारी, त्यांना समजण्यासाठी झटून काम करण्याची परिभाषा शिकवणार भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे.




