बुलढाणा जिल्हा प्रतिनीधी: -सुनील वर्मा
मेहकर:-
अंधृड येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सौंदर्यीकरण,सभामंडप , सिमेंट रस्ता आदींचे लोकार्पण व अंधृड ते नागापुर या तीन कोटी खर्चाच्या कामाचे भूमिपूजन अशा चार कोटींच्या कामांचे लोकार्पण माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते आज पार पडले.

संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून ही सर्व विकासकामे मंजूर झालेली होती.आचार संहिता सुरू झाल्याने येथील लोकार्पण आणि काही कामांचे भूमिपूजन निवडणूक काळात करता आले नाही.ग्राम पंचायतीने आज या सोहळ्याचे आयोजन केले होते.
२८ लाखांच्या तलाठी भवनाचे लोकार्पण संजय रायमुलकर यांच्या हस्ते झाले.सिमेंट नाला व रस्ता बांधकाम , छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सौंदर्यीकरण , मागासवर्गीय वस्तीतील सिमेंट रस्ता लोकार्पण , ३ कोटी रुपये खर्चाच्या अंधृड ते नागापूर रस्त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. महादेव मंदिर जवळ २१ लाख रुपये खर्चून बांधण्यात यावयाच्या सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले.या निमित्ताने आयोजित जाहीर सत्कार कार्यक्रमात बोलतांना शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीपराव देशमुख म्हणाले की, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून या गावात ३० कोटींची विकास कामे झाली. थोडक्यात मतांनी विधानसभा निवडणुकीत रायमुलकर पराभूत झाले. हा त्यांचा पराभव नसून एक प्रकारे जनतेचाच पराभव आहे पुढे होणाऱ्या विकास कामांना त्यामुळे खिळ बसली आहे.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, जितुभाऊ सावजी, शरद देशमुख ,विष्णू पाटील ,नायबराव देशमुख, भागवत देशमुख ,सुमित पाटील ,माणिकराव देशमुख, संतोष जागृत ,दिनकर चव्हाण ,नारायण देशमुख, नंदू सावजी,नितीन गा,योगेश सौभागे,आकाश ढोरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अरुण देशमुख, अतुल देशमुख, पी आर देशमुख, विजय देशमुख, किशोर वैद्य ,सरपंच बाळासाहेब देशमुख, पंडितराव देशमुख ,सुधाकर देशमुख, संजयराव देशमुख, राहुल देशमुख ,साहेबराव देशमुख, भिकनराव देशमुख, कैलास देशमुख ,पंजाबराव देशमुख आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संजय रायमुलकर म्हणाले की, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदैव निरपेक्षपणे माणुसकी हा एकच धर्म मानून सेवेचे कार्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून चार हजार कोटींपेक्षा जास्त कामे मेहकर मतदार संघात आणता आली. राज्य आणि केंद्रात आपलेच सत्ता असल्याने यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर विकास कामे मेहकर, लोणार तालुक्यात आणली जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. विदर्भात सर्वाधिक सभामंडपाची कामे मेहकर मतदार संघात करण्यात आली. पेनटाकळीच्या कालव्यासाठी ५८५ कोटी मंजूर करून आणले. मेहकर शहरात ९०० कोटींची विकास कामे झाली. समृद्धी जवळील नवनगर उभारणीसाठी आलेल्या अडथळ्यांवर मार्ग काढण्यात येईल, असेही ते म्हणाले.
आम्ही जी कामे मंजूर करून आणली त्याची भूमिपूजन व लोकार्पण आम्ही करणार आहोत. नवीन लोकप्रतिनिधीने नव्याने कामे मंजूर करून आणून ती पूर्ण करावीत, असे सांगून रायमूलकर म्हणाले की, आमच्या कामांचे श्रेय त्यांनी घेऊ नये. एक लाख मतदारांनी आम्हाला मते दिली असल्याने त्यांच्या सेवेसाठी आपण अहोरात्र कार्यरत राहणार आहोत . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्जेराव देशमुख यांनी केले, तर संजय महाराज यांनी आभार मानले.
***


