अकोला जिल्हा प्रतिनिधी:- गणेश वाडेकर
मूर्तिजापूर शहरात गेल्या महिन्याभरापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून महिन्याभरात मूर्तिजापूर शहरात ९ ते १० ठिकाणी घरफोड्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र पोलिसांना चोरट्यांचा शोध घेण्यात अद्यापही यश मिळाले नसतानाच पुन्हा एकाच परिसरात एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्याची घटना घडली. एकसष्ट हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. विशेष म्हणजे चोरट्यांनी आजूबाजूच्या घरातील नागरिकांना आवाज येईल या भीतीपोटी चक्क परिसरातील इतर घरांना बाहेरून कडी लावून बंदिस्त करून ठेवल्याची माहिती आहे*.


